रिपाइं (आठवले )च्या वतीने एसडीओ कार्यालयावर निदर्शने

 




विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूर : अतिक्रमण धारक व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आज दुपारी रिपाई (आठवले) चे जिल्हाध्यक्ष सुनील अवचार व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण यांच्या मार्गदर्शनात आणि तालुकाध्यक्ष अजय प्रभे, तालुका महासचिव समाधान वानखडे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले.  




    तालुक्यातील १४ एप्रिल १९९० पर्यंत अस्तित्वात असलेल्या गायरान (ई -क्लास) जमिनींवर शेतीसाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करुन त्या अतिक्रमणधारकांना कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावेत, तालुक्यात होत असलेल्या घुंगशी-मुंगशी बॅरेज मुळे बाधित होणाऱ्या अतिक्रमणधारकांना आणि तालुक्यातील  ज्या  गायरान जमिनींवर  सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले अशा अतिक्रमणधारकांना  प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित  करण्यासाठी  उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निळे झेंडे उंचावून निदर्शने करीत घोषणा देऊन हे लक्ष वेधी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उप विभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना देण्यात आलेल्या मागण्यांच्या निवेदनातून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

     या आंदोलनात संविधान वानखडे,गणेश थोरात, दिनेश पेठकर, दयानंद तेलगोटे,पियुष प्रभे ,राजेंद्र वरघट, श्यामअन्ना  जाधव, राजकुमार खांडेकर, रमेश गवई, प्रेमदास डोंगरे, राजेश पाईकराव, राहुल तायडे, भीमराव सरदार, मधुकर थोरात, बळीराम वानखडे, सुनंदा बाई रायबोले, साहेबराव गवई, सिद्धार्थ गवई, अश्विन इंगळे,शंकर खंडारे, मंगेश भटकर,मंगल पवार, शिवनाथ पवार, प्रल्हाद गवई, गौतम गवई आदी कार्यकर्त्यांसह शेकडो अतिक्रमण धारक सहभागी झाले.

-------------------------------------

मागण्या मान्य न झाल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करत राहाणार व आठवले साहेबांच्या संमतीने पुढील आंदोलनाची दीशा ठरविणार.

-अजय प्रभे, तालुकाध्यक्ष, रिपाई(आठवले).

-----------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post