{ अक्षर मानव संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. }
भारतातील पहिले जातमुक्त गावं महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील, नेवासे तालुक्यातील सौंदाळा हे गावं ठरलं आहे. महाराष्ट्र भर नव्हे तर संपूर्ण भारतात संध्या हे गाव चर्चेच आहे. या गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सोबत दिनांक 22/02/26 रोजी रविवारी सकाळी १० ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायत परिसरात अक्षर मानवचा संवाद सहवास उपक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
संवाद सहवासाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. काॅ. बाबा आरगडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक सौंदाळा या जात विरहित गावचे मुळ संकल्पनेचे प्रणेते, प्रसिद्ध समाजसेवक, महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. प्रमोद झिंझाडे, सौंदाळा गावचे सरपंच मा. शरद बाबाराव आरगडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्षर मानवच्या समाजसेवा विभागाच्या अध्यक्षा सौ. अनुजा ताई पाटील, अक्षर मानवचे राज्य नियंत्रक तथा राज्य संचालक मा. आझाद जमा खान, राज्य संघटक मा. सुजित चव्हाण, समाजसेवा विभागाचे प्रचारक हरिभाऊ उगले व्यासपीठावर उपस्थित होते.
5 फेब्रुवारी 2026 ला या सौंदाळा ग्रामपंचायतने ग्रामसभेत जातमुक्त गावाची अधीकृत घोषणा केली आणि भारतातील पहिले जातमुक्त गावं होण्याचा आम्हाला सन्मान मिळाला. महाराष्ट्र भर नव्हे तर संपूर्ण भारतभर आमचं गाव चर्चेत आले आहे. अनेक फोन, अनेक संघटना ग्रामपंचायतचे आणि ग्रामस्थ यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सामाजिक संघटना या गावात भेटी द्यायला येत आहे. आता पुढचा लढा आमचा 5 फेब्रुवारी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय जातमुक्त दिन' झाला पाहिजे. असा आम्ही पाठपुरावा करु प्रत्येक व्यक्तीने 5 फेब्रुवारी हा दिवस जातमुक्त दिवस पाडला पाहिजे. " जात सोडा, भारत जोडा " हा नारा भारतभर जावू द्या होळी च्या दिवशी आपली जात जाळा असा संदेश त्यांनी आपल्या भाषनात ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद झिंझाडे यांनी आवाहन केले.
डोक्यातील जात ही मानसिक आणि सामाजिक भेदभाव निर्माण करते, तसेच डोक्यातील जात ही मारामाऱ्या, दंगली, द्वेष, तिरस्कार, भांडण करायला लावते.
माणसाच्या मेंदुत जात जीवंत राहली तर ती समाजासाठी जास्त धोकादायक असते मी स्वतः जात सोडुन जगतो इथं कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपली जात सोडली पाहिजे. आपली जात सोडुन आपल्याला जगता आलं पाहिजे. हा मंत्र इथुन प्रत्येक व्यक्तीने न्यायला पाहिजे तरच तुमचं इथं येणं सार्थकी लागेल. जातीला मुठमाती देणार अख्खं गाव मला मिळालं आहे. सौंदाळा गावाच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू असे प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भातुन आलेले अक्षर मानवचे महाराष्ट्राचे राज्य नियंत्रक श्री. आझाद खान यांनी उपस्थित नागरिकान समोर आपले मनोगत व्यक्त केले.
माणुसकीला पूरक असेल ते सर्व भेदभाव मिटवून मानवी हिताचे उपक्रम अक्षर मानवच्या माध्यमातून आपण या गावात सतत घेत राहू. अक्षर मानवचे नव्वद पेक्षा जास्त विभाग आहेत असे सांगुन अक्षर मानवची भुमिका मांडताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यावर आधारित ग्रामपंचायत मध्ये आम्ही अधिकृतपणे ठराव घेऊन राज्यातील पहिल जातमुक्त गावं केलं तेव्हा पासून सतत आमचा सत्कार होत आहे. नवनवीन लोक आमच्या भेटीला येत आहेत. गावात कोणताही प्रकारचा जातीय भेदभाव , अस्पृश्यता किंवा बहिष्कार नाही. मंदिरे, पाणीपुरवठा, स्मशानभूमी , शाळा, समान हक्काने खुली, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या प्रोत्साहन, विधवा पुनर्विवाह करणाऱ्यांना 11000/- रुपयेच अनुदान ग्रामपंचायत देते. महिलांच्या नावाने शिवी दिल्यास 500 रुपये दंड ग्रामपंचायत वसुली करते , महिलांच्या अपमान करणाऱ्या वर गावात पुर्णतः बंदी आहे. असे अनेक ग्रा. पंचायतने घेतलेल्या ठरावाची माहिती गावचे सरपंच शरद आरगडे साहेब यांनी दिली. बाबा आरगडे साहेबांनी अध्यक्षीय भाषणात संपुर्ण सौंदाळा गावाचा इतिहास सांगितला.
या प्रसंगी गावचे ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद झिंझाडे सह गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. हा सत्कार आमचा नसून संपूर्ण या सौंदाळा गावकऱ्यांचा हा सत्कार आहे. अशी प्रतिक्रिया गावचे सरपंच शरद आरगडे यांनी व्यक्त केली. अक्षर मानव मुळे आम्हाला अधिक बळ मिळाले असे शेवटी प्रमोद झिंझाडे बोलले.
मान्यवरांन सहित काही गावकरी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. चिंचाळे गावचे , राहुरी येथील बाळासाहेब मुन्तोडे यांनी सकाळी गावात भिक्षू वेशभूषा करून गावात फेरफटका मारत गावावर अनेक कविता सादर करत, पोवाड्याद्वारे उपस्थीतांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी परभणी, मुंबई, पुणे, संभाजीनगर, संगमनेर, शेवगाव, पाथर्डी, नाशिक, सोलापूर, वैजापूर, जळगाव, आदी भागातून सुमारे 80 कार्यकर्ते उपस्थित होते. सौंदाळा गावाचे सरपंच शरद आरगडे, उपसरपंच भिमसेन गरड, व अन्य ग्रामपदाधिकाऱ्याच्या विशेष सत्कार करण्यात आला. सकाळी 10 वाजता सुरू झालेला कार्यक्रम दुपारी 2 वाजता स्नेह भोजनानंतर संपन्न झाला. गावातील पदाधिकारी, आयोजक, गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायतीच्या विशेष प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.

