चंद्रपूर,राजुरा विशेष प्रतिनिधी : कुंसुबी येथील २४ आदिवासी कुटुंबांना ४५ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. या कुटुंबांना ६३.६२ हेक्टर शेतजमीन, घरांचा मोबदला व प्रत्येक पात्र व्यक्तीस एक नोकरीत सामावून घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. २०१३ पासून सातत्याने लढणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
विनोद खोब्रागडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक ६५७/२०२१ दाखल करून संबंधित कंपनी व महसूल विभागाच्या धोरणाला आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाने कंपनी आणि महसूल अधिकाऱ्यांना कुंसुबी येथील २४ आदिवासींना मोबदला अदा केल्याचा पुरावा सादर करण्याचे निर्देश दिले होते.

.jpeg)