नक्की प्रकरण काय.?
नातेवाईकांनी केली प्रियकराची बेदम धुलाई, प्रियकरावर रूग्णालयात उपचार सुरु...
विदर्भ, (nagpur)नागपूर - प्रेयसीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना मद्यधुंद प्रियकराने तिच्या चितेवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यात प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अनुराग राजेंद्र मेश्राम असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मृत अंशिका नितीन खोब्रागडे या युवतीचे त्याच परिसरात राहणाऱ्या अनुराग मेश्राम या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
पण या प्रेमाच्या वाटेवर अडचणी असल्याचे लक्षात आल्यावर अंकिताने ८ जुनला आत्महत्या केली. अंशिकाच्या लहान बहिणीने वडील व आईला घटनेची माहिती देताच वडिलांनी शेजाऱ्याला बोलवून अंशिकाला खाली उतरवून कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
गळफास घेऊन आत्महत्या करताना अंशिकाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझ्या मृत्यूसाठी अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नये. आणि अनुरागला काहीही करू नये असा उल्लेख केला होता. अंकिताचं शवविच्छेदन पार पडल्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तिच्यावर अंत्यविधी पार पाडत असताना अचानक अनुराग मेश्राम हा तिथे पोहोचला. त्याने शरणावर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नातेवाइकांनी त्याला रोखत बेदम मारहाण केली. घटनेच्या माहिती नंतर अनुरागच्या वडील आणि भावानी त्याला लगतच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. सरणावर उडी घेत असताना त्याने कुठलेतरी द्रव्य प्राशन केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
वैद्यकीय अहवालानंतरच या सगळ्या बाबीचा खुलासा होणार आहे.या घटनेनंतर सहाय्यक पोलिस उपायुक्त विशाल क्षीरसागर, कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. अनुराग मेश्राम शुद्धीवर आल्यावर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Tags : #nagpur, #gavakadachiBatmi #Maharashtra, #india, #nagpurpolice, #आत्महत्येचाप्रयत्न, #गावाकडचीबातमी, #नागपूर, #विदर्भ
