"पंधराव्या वित्त आयोग निधीत अनियमितता, प्राथमिक चौकशी अहवालातून झाले उघड"
अचलपूर : परतवाडा नजीकच्या बेलज ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोग निधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार संबंधित सचिवाने केल्याचा ठपका प्राथमिक चौकशीत ठेवण्यात आला आहे. सचिव दोषी आढळल्याने कारवाईस पात्र असल्याची शिफारस पंचायत समितीने वरिष्ठांना पाठविलेल्या अहवालात केली आहे. यासंदर्भातील तक्रार मंत्रालय व पंचायत समितीमध्ये कार्यकर्त्यांनी केली होती.
बेलज ग्रामपंचायत येथे पंधरावा वित्त आयोग निधीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशीची मागणी व संबंधितांवर कारवाईची तक्रार योगेश बुटे व प्रशांत मामनकर यांनी ग्रामविकासमंत्री व जिल्हा परिषदेमध्ये दि. ९ एप्रिल रोजी केली होती. मंत्रालयातून पत्र येताच चौकशीला सुरुवात झाली होती. ग्रामपंचायत अधिकारी अमोल आडे यांनी पंधरावा वित्त आयोगांतर्गत साहित्य खरेदीबाबत पुरवठाधारकास देयक पंधराव्या वित्त आयोग निधीत अनियमितता, प्राथमिक चौकशी अहवालातून झाले उघड अदा करताना पीएफ एमएस प्रणालीद्वारे मोघम स्वरूपात जीओ टॅग चुकीच्या पद्धतीने करून व ग्रामस्वराज लॉगइन करून ब्लॅक फोटो अपलोड करणे व अपलोड करून नियमबाह्य पद्धतीने देयक अदा केले आहे. पंधरावा वित्त आयोगांतर्गत साहित्य ग्रामपंचायतला प्राप्त करून न घेता संबंधित पुरवठाधारकास देयक अदा करून वित्तीय अनियमितता केली आहे.
"साहित्य किती प्राप्त, कोण जाणे..!
पंधरावा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या साहित्य खरेदीबाबत डिलिव्हरी मेमो चौकशीदरम्यान उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतला नेमके किती साहित्य प्राप्त झाले, याची खात्री पटत नाही व साहित्याच्या विल्हेवाटीबाबत स्टॉक रजिस्टरमध्ये मोघम स्वरूपात नोंद घेतलेली आहे."
"पूर्वीच दिला धनादेश..!
कारवाईची शिफारस १ एप्रिल २०२५ नंतर ग्रामपंचायतीला साहित्य प्राप्त झाले. साहित्य प्राप्त होण्यापूर्वी नियमबाह्य देयक अदा केल्याचा ठपका समितीने ठेवला. सचिवपदाच्या कर्तव्यावर कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने कारवाईला ते पात्र असल्याची गटविकास अधिकाऱ्यांनी शिफारस केली आहे."
Tags : Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर), महाराष्ट्र, ग्रामपंचायत, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अमरावती