तीन गोवंशासह हाडूक भरलेले वाहन पकडले ;चार लाखाचा मुद्देमाल जप्त
byGavakadachi Batmi -
0
श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरातील वार्ड क्रमांक दहा एका घरात कतलीच्या उद्देशाने आणलेले तीन गोवंश आणि हाडूक भरलेले वाहन उभे असल्याची गोपनीय माहिती माहूर पोलीस ठाण्याचे सपोनि शिवप्रकाश मुळे यांना मिळाल्याने सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी पोलीस होमगार्ड सह अचानकपणे धाड टाकून तीन गोवंश आणि हडुक भरलेला टेम्पो असा एकूण चार लाख दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याची घटना दि 8 रोजी 12.40 वाजता घडली आहे.
गोपनीय माहिती दाराकडून माहिती मिळाल्याने माहूर पोलिसांची पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी वार्ड क्रमांक दहा येथे एका घरावर छापा मारला असता येथे कत्तलीच्या उद्देशाने आणलेले तीन बैल गोवंश आणि त्या घरासमोर महिंद्रा पिकप टेम्पो MH-30-AB-1994 मध्ये सहा क्विंटल गोवंशाची हाडे असलेले जप्त करत गोवंश आणि हाडांनी भरलेला टेम्पो माहूर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून एकूण पाच आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
असून पुढील तपास सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका गजानन चौधरी पोहे का प्रकाश गेडाम पोहेका परमेश्वर कनकावाड गजानन जाधव, संग्राम पवार ,ज्ञानेश्वर वेलदोडे,नामदेव इंनकर आणि होमगार्ड संजय चव्हाण अरविंद राठोड, आकाश गिनगुले, अजय राठोड, पंकज मुरकुटे उपस्थित होते . सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका गजानन चौधरी हे पुढील तपास करत आहेत.