बुलडाणा : जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचा सन्मान व आरोग्य जनजागृती सोहळा आज 8 मार्च रोजी स्त्री रुग्णालय बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रम जिल्हा रुग्णालय /स्त्री रुग्णलय/ क्षय आरोग्यधाम रुग्णालय बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कृत्ववान महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे यांच्या सामाजिक कार्याचा दखल घेऊन शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.झिने साहेब तसेच स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील मेट्रन कुलकर्णी सहाय्यक मेट्रन कुलसंगे आदी मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी तिनीही रुग्णालयातील स्टाफ मोठ्या संख्येने हजर होत्या.