शिरखेड पोलिस स्टेशन येथे महिला दिनी झाला महिला पोलीस कर्मचारी व महिला पोलीस पाटलांचा भावपूर्ण सत्कार





नेरपिंगळाई(प्रमोद घाटे ): शिरखेड पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस कर्मचारी व महिला पोलिस पाटील यांचा ८ मार्च महिला दिनी शाल व भेटवस्तू देउन शिरखेड ठाणेदार सचिन लुले यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला .

शिरखेड पोलिस स्टेशन व नेर पिंगळाई येथील महिला अल्पजा बडासे. आणि रमाताई इंगळे यांच्या महिला ग्रुप मार्फत ८मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.माधवी वानखडे व प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार सचिन लुले,अँड. शुभम गाडे. दुय्यम ठाणेदार राहुल गवई. पी.एस.आय ठाकरे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली. यात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यात ठाणेदार सचिन लुले यांनी महिला दिनी महिलांना मोलांचे मार्गदर्शन केले . सत्कार सोहळ्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यां सह निवृत्त पोलिस पाटिल याचा सुद्धा यावेळी सत्कार व सन्मान करण्यात आला.

    या कार्यक्रमाला पोलिस कर्मचारी व पोलिस पाटिल उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पजा बडासे, रमाताई इंगळे. शिरखेड पोलीस स्टेशनचे खुपीया पोलीस कर्मचारी वैभव घोगरे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्र संचालन नेरपिंगळाईचे पोलीस पाटील राजेश राऊत यांनि केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रंमाणात महिला पोलिस कर्मचारी. व महिला सामाजिक कार्यकर्त्या. महिला पोलीस पाटील आणि पत्रकार मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post