गावाकडची बातमी| गर्भवती महिलेसह पतीवर अमानुष हल्ला; आशा वर्करसह दोघांना अटक

 

चिखलदरा तालुक्यातील डोमा गावातील घटना...


अमरावती, चिखलदरा -: चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून एका आशा वर्करने तीन महिन्यांची गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर गंभीर मारहाण करण्यात आली, तसेच तिचे दातही तोडण्यात आले. 

हल्लेखोर आशा वर्कर ने पीडित महिलेच्या पतीवरही लाकडी काठीने हल्ला केला. या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. महिलांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या आशा वर्करकडूनच असा अमानवी प्रकार घडल्याने आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Tags:  #Amravati Crime News, #चिखलदरा #डोमा #गावाकडचीबातमी #अमरावती #रुपाली चाकणकर #महिला आयोग #आशा वर्कर , #amaravatinews #police #आरोग्यविभाग #marathinews, #AmaravatiCrime, #बातमी मराठी #गावसहेली #gavsheli ,#ViolenceAgainstWomen #PregnantWomanAssault #Domestic Violence #WomenSafety, #मानवी हक्क आयोग, #HumanRights#StopAbuse#GenderBasedViolence #ProtectWomen #batmigavakadachi.llive #राज्य मानवी हक्क आयोग #महाराष्ट्र पोलीस 

#GavakadachiBatmi.com

Post a Comment

Previous Post Next Post