अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये - ठाणेदार अजित जाधव

 


चोर असल्याच्या संशयावरून युवकास मारहाण 


मूर्तिजापूर शहर पो स्टे ला चौघांविरुद्ध गुन्हे दाखल


    



मूर्तिजापूर - शहरासह तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी केले आहे.

          शहरासह तालुक्यात घडत असलेल्या चोरीच्या घटना त्यात काही नागरिक आपल्या स्वार्थापोटी, वैयक्तिक बदला घेण्यासाठी वाटसरू किंवा मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी जमाव असलेल्या ठिकाणी, रात्री फिरणारे लोकांवर संशय घेऊन त्यांना चोर असल्याचा आरोप करत अमानुष मारहाण करण्यात येत आहे अश्या अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता कायदा हातात घेऊ नये असे आवाहन त्यांनी १७ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत केले. चोराचा संशय घेऊन होणारी मारहाण एखाद्याच्या जिवावर बेतू शकते अश्या घटनांना आळा बसेल याउद्देशाने मुर्तिजापूर शहरातील वडरपुरा स्टेशन विभाग परिसरात १६ एप्रिल २०२४ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चोर असल्याच्या संशयावरून संजय शाम पवार वय २४ हा मित्रा सोबत महाजन वाईन बार लगत मोकळ्या जागेत मित्र निखिल रविदास पवार, मनिष भोसले, आझाद माही चव्हाण, दिपक भोसले यांच्या सोबत बसला असताना चार आरोपीनी मारहाण केली.

 या प्रकरणी पवन गुंजाळ, श्रेयस चव्हाण, बादल डेडूले, तनय शितोळे राहणार सर्व मूर्तिजापूर यांच्या विरुद्ध कलम ११८(२), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी केली पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सपोनि अनिल पवार आणि पोलीस अंमलदार अनिल राठोड, पोकॉ पवन बोडखे हे करित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post