मोफत शिकवणी वर्गातील नवोदय प्रवेशासाठी चार विद्यार्थी पात्र
प्रकाशवाट प्रकल्प व शिक्षण विभाग मूर्तिजापूर यांचा संयुक्त उपक्रम
मूर्तिजापूर - ग्रामीण भागातील गोर-गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या उदात्त हेतूने न्यायमूर्ती अनिल कीलोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या " प्रकाशवाट " प्रकल्पाचे पुढचे पाऊल " सुपर ५० " या शिर्षकाखाली यावर्षीपासून नव्याने सुरू केलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी मोफत शिकवणी वर्गाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला असून यामध्ये प्रवेशासाठी चार विद्यार्थी पात्र झाले आहेत.
न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रकाश वाट प्रकल्प, प्रा.शरद पाटील, विद्यार्थी प्रिय तथा जागतिक दर्जा प्राप्त कौन्सीलर राजा आकाश यांच्या मार्गदर्शनात तसेच मूर्तिजापूरचे लाडके आमदार हरिष पिंपळे तसेच नागपूर येथील उद्योजक संदिप अंजनकर आणि संजय इंदुरकर यांच्या आर्थिक पाठबळाने मूर्तिजापूर येथे प्रथमच ग्रामीण भागातील होतकरू, हुशार व गरीब विद्यार्थ्यांकरिता सुपर ५० इयत्ता पाचवी जवाहर नवोदय विद्यालय मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.याकरिता इयत्ता पाचवीच्या ग्रामीण भागातील,जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यामधून निवड परीक्षा घेऊन सुपर फिप्टी म्हणून ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती व त्यांना माहे ऑगष्ट २०२५ पासून १७ जानेवारी पर्यंत ८० दिवस मोफत शिकवण्यात आले. याकरिता मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील होतकरू आणि आदर्श शिक्षक यांनी शनिवार आणि रविवार हा आपला हक्काचा सुट्टीचा दिवस सोडून या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानदादाचे पवित्र कार्य केले. त्यांच्या या अथक प्रयत्नाने प्रकाश वाट प्रकल्पाचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला पहिल्याच परीक्षेत या वर्गातून चार विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र झाले.न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या संकल्पनेनुसार वर्ग सुरू करण्यात आले परंतु त्यापुढे खूप मोठे आवाहन होते की हा वर्ग वर्षभर चालवायचा कसा याकरिता मूर्तिजापूरचे लाडके हरिष पिंपळे यांनी तालुका शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गरीब होतकरू विद्यार्थ्यांकरिता हा वर्ग सुरू करण्यात मोलाचे सहकार्य केले. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट आणि ड्रेसची मोफत व्यवस्था त्यांच्या गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेकडून करून दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सकाळी दहा ते चार या कालावधीत नाश्ता आणि इतर साहित्य करिता सुद्धा आर्थिक बाजूची गरज होती. त्यात सर्वात प्रथम सुभाष दूध डेरीचे संचालक प्रशांत हजारी यांनी पुढाकार घेतला ,विद्यार्थी सकाळी वर्गासाठी निघून येत होते ,काही विद्यार्थी काही न खाता वर्गात येत असल्यामुळे या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी दुधाचे वाटप करण्यात आले.हे संपूर्ण दूध प्रशांत हजारी यांनी विनामूल्य पुरविले.या वर्गाला बुद्धिमत्ता विषय अध्यापन करण्याकरिता एक स्मार्ट बोर्डची आवश्यकता होती .हा स्मार्ट बोर्ड जवळपास एक लाख रुपयाचा होता या करीता न्यायमुर्ती अनिल किलोर यांनी पुढाकार घेऊन डॉ. गजानन नारे, संचालक प्रभात किड्स यांच्या कडून प्राप्त करून हा प्रश्न सोडवला.आता या विद्यार्थ्यांना नाष्टा देण्याकरिता आर्थिक मदती करिता नागपूर येथील प्रसिद्ध उद्योगपती संदिप अंजनकर आणि संजय इंदुरकर यांनी मूर्तिजापूरला येऊन ५१ हजार रुपयांची देणगी या प्रकल्पाला दिली तसेच या प्रकल्पातील विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ५१ हजार रुपये देण्याचे त्यांनी कबूल केले.प्रकाशवाट प्रकल्पाचे आमचे आधारस्तंभ सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत अवघाते यांनी कार्यक्रमाकरिता संपूर्ण हॉल आणि नाश्ता जेवणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. तुषार बायसकर यांनी सुद्धा जे सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे तसेच या विद्यार्थ्यांना मोफत ओपीडी उपलब्ध राहील असा शब्द दिला. या प्रकल्पादरम्यान विद्यार्थ्यांना लागणारे स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास ३० ते ४० हजार रुपयाची गरज होती. ही जबाबदारी मुख्याधिकारी तेल्हारा सतीश गावंडे यांनी उचलली. तसेच सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा वर्ग नेमका सुरू कोठे करायचा त्या करीता चांगले वातावरण आणि जागेची आवश्यकता असताना येथील मुख्याधिकारी शेषराव टाले आणि त्याची चमू विशेष म्हणजे भूगुल यांनी मुर्तीजापुर नगरपरिषद मधील एक हॉल उपलब्ध करून दिला त्यामुळे प्रकाश वाट प्रकल्पासमोरची मोठी अडचण दूर झाली. तसेच या प्रकल्पाला लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे लोकांपर्यंत हा प्रकल्प पोचवण्यासाठी प्रसार माध्यमाची सुद्धा आम्हाला फार मोलाची मदत झाली प्रकल्पातील महत्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविण्या करीता त्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केले.मुर्तीजापूर येथील सर्व पत्रकारांनी बांधवांनी आम्हाला या प्रकल्पाकरिता मदत केली.
हे सर्व आर्थिक आणि इतर प्रश्न सर्व मुर्तीजापुर वासियांच्या सहकार्याने सुटले परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या करिता प्रशिक्षित तज्ञ मार्गदर्शकाची आवश्यकता होती. याकरिता मुर्तीजापुर पंचायत समितीचे गटविकास अधिकार अशोक बांगर व गटशिक्षणाधिकारी संजय मोरे यांनी जबाबदारी स्वीकारली. तुम्हाला हा वर्ग चालवण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याचा शब्द दिला. गटशिक्षणाधिकारी संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात मुर्तीजापुर तालुक्यातील आमचे सहकारी मित्र व उत्कृष्ट आदर्श शिक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन सुट्टीच्या दिवशी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे सर्व शिक्षक स्वखर्चाने अमरावती,कारंजा, दर्यापूर, अकोला येथून येत होते. आपल्या मुलाबाळांची पर्वा न करता शनिवार , रविवार आणि दिवाळी सुटीत त्यांनी मुलाना मार्गदर्शन केले. तसेच ८० दिवस नाश्ता देण्याचा भार सर्व शिक्षक, तसेच मुर्तीजापुर येथील सेवाभावी दानशूर व्यक्तींनी उचलला. सर्व मार्गदर्शक तज्ज्ञ शिक्षक यांनी कोणी अंगमेहनत, कोणी भेट वस्तू ,तर काहींनी वाढदिवसाच्या दिवशी नास्ता देऊन मदत केली,या सर्वांच्या मदतीने व प्रेरनेने मूर्तिजापूर नगरीत ग्रामीण भागातील गोरगरीब विदयार्थ्यासाठी एक नवीन शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली . वर्षभर मोफत शिकवणी वर्गाचे फलित म्हणजे ग्रामीण भागातील चार मुले जवाहर नवोदय विद्यालय करीता पात्र झाली . विशेष म्हणजे या उपक्रमात जे ५० विद्यार्थी निवड करण्यात आली त्यांचे पालक आई-वडील यांनी दिवसभर वर्गाच्या ठिकाणी थांबून अतिशय तळमळीने कार्य केले. त्यात विद्यार्थ्यांना नाश्ता वाटप असो हॉलची सफाई असो की इतर सर्व कामे स्वयंम प्रेरणेने या पालकांनी करून ते सुद्धा प्रकाश वाट प्रकल्पाचा एक भाग आहे हे त्यांनी सिद्ध केले.वरील सर्व घटकांच्या सहकार्याने या वर्गामध्ये पहिल्याच वर्षी चार विद्यार्थी जवाहर नवोदय साठी पात्र ठरले यामध्ये आदित्य योगेश सोळंके, जि.प. हायस्कुल माना, शाश्वत अविनाश डोंगरे, जि. प. शाळा पोही, अंशुमन शुद्धोधन जामनिक , जि.प.शाळा ब्रम्ही व श्रेयश चंद्रप्रकाश आखाडे पिंजर (बा x टा )या सर्व विध्यार्थी , त्यांचे शिक्षक आणि पालक यांचे खूप खूप अभिनंदन तसेच या प्रकल्पाला साथ देणारे सर्व घटक आणि मूर्तिजापूर वासियांचे मनापासून खूप खूप आभार. यावर्षी सुद्धा तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांकरिता हा प्रकल्प असाच सुरू ठेवण्याचा मानस असून प्रकाशवाट प्रकल्पाला आपल्या सर्वांचे असेच मोलाचे सहकार्य लाभेल हीच अपेक्षा प्रकाशवाट प्रकल्पाच्या टिमला आहे.