राजुरा न्यायालयातील भोंगळ कारभार उघड
कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी राजुरा यांच्या सह ६ अधिकारी व कर्मचारी यांची मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांना गंभीर तक्रार शपथपत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी केली.
प्रोसिजर फालो न करता न्यायाधीश यांनी स्वतःची साक्षरी न करताच निर्णय दिला कसा.?
चंद्रपूर : दिनांक ०३/०५/२०२५ रोजी सकाळी केस न्यायाधीश समोर दाखल झाली, दुपारी ३.०० वाजता रजिस्टर झाली.व ४ वाजता आर्गुमेंन्ट झाले. सायंकाळी ५ वाजता निर्णय दिला व स्वतःची साक्षरी केलीच नाही. रोजनामा पहा इतक्या घाईघाईत बोगस आदेश केला. पाच दिवसांनी त्या रोजनामा व निर्णय यांची प्रमानीत प्रत विनोद खोब्रागडे यांना दिली तेव्हा हा गंभीर प्रकार न्यायाधीश व बाकिच्या अधिकारी मध्ये सुद्धा ही बाब निदर्शनास आली नाही ? इतकी गंभीर चुक निष्काळजीपणा, बेजबाबदार पना न्यायालयात होते कशी तक्रारदार खुद्द विनोद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व सर न्यायाधीश दिल्ली, तसेच मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर न्यायमूर्ती व प्रमुख न्यायाधीश चंद्रपूर यांना गंभीर तक्रार केली आहे व त्याची प्रत समंधित न्यायाधीश यांना सुद्धा दिली आहे.
गैरर्जदार १)कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी राजुरा (नाव लिहीत नाही), २)बेंच क्लर्क, ३)स्टेनो,४)शिरस्तेदार, ५)कापींग बाबु, ६) अधिक्षक या एकानेही न्यायाधीश यांची साक्षरी प्रोसिंडीग रोजनामा मध्ये नाही हे बघितलेच नाही व प्रमानीत प्रत विनोद खोब्रागडे यांना दिली.
मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मुंबई, सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांना गंभीर तक्रार केली असून एक तक्रारीची प्रत राजुरा न्यायालयात सुद्धा दिली आहे.
मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय काय कारवाई करतात याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही. कायद्याच्या पुढे सर्व समान आहेत कोणीही असु द्या..
समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे..
फिर्यादी विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी आजपर्यंत शासन, प्रशासन,असो, मंत्री असो,जिल्हाधिकारी असो, पोलिस प्रशासन असो, वकील मंडळी असो की न्यायाधीश असो की कंपन्या असो कि रामदेव बाबा असो चुकीचे काम करीत असेल तर एकालाही सोडले नाही, न्यायालयातून फौजदारी कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी चंद्रपूर सह अनेक अधिकारी विरुद्ध दिनांक ०९/०५/२०२५ रोजी अट्रासिटीचा कलमानुसार FIR दाखल करण्याचे आदेश कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बलारपूर यांनी दिले.
न्याय दंडाधिकारी यांची स्वाक्षरी आदेशावर नसल्यामुळे या न्यायालयात अशा प्रकरणावर अशा आदेशासह किती आदेशांना जन्म घातला असावा याचा अंदाज घेणे काळजी गरज असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे..
Tags : #महाराष्ट्र, #चंद्रपूर, #राजुरा, #न्यायालय, #fir, #गावाकडचीबातमी, #विनोदखोब्रागडे, #कोर्ट, #india, #Court, #Chandrapur, #VinodKhobragade,