प्रा.डॉ. रामप्रसाद तौर यांना राज्यस्तरीय लोककला परिसंवादासाठी निमंत्रण

 





किनवट : सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ लोकसाहित्य अभ्यासक प्रा. डॉ. रामप्रसाद तौर यांना दिनांक १ मार्च रोजी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे राज्यशासनाच्या सांस्कृतीक कार्य विभाग व सांस्कृतिक संचालनालय द्वारा आयोजित लोककला परिसंवाद मध्ये “पारंपारीक लावणीचे बदलते स्वरुप” यां विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

      किनवट सारख्या दुर्गम व आदिवासी भागात राहुन माय मराठीची सेवा करत असलेले प्रा. तौर यांना शासनाच्या परिसंवादामध्ये आमंत्रित केल्याने हि किनवट तालुक्या करिता अभिमानाची बाब आहे. प्रा. तौर हे सदर परिसंवादाचे प्रमुख वक्ते असुन त्यांच्या सोबत प्रा. डॉ गणेश चंदणशिवे मुंबई विद्यापिठ लोककला अकादमी प्रमुख व खंडुराज गायकवाड मंत्रालयातील पत्रकार यांचे देखिल व्याख्यान होणार आहे. आयोजित परिसंवाद हा प्रा. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असुन यामध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची देखिल उपस्थिती राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post