अमरावती जिल्हा कृषी विकास परिषद व प्रदर्शनी मध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल

           जिल्हा प्रतिनिधी  पवन पाटणकर शिराळा

 शिराळा :  महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) मार्फत १४/२/२५ ते १८/२/२५ या कालावधीत सायन्सकोर मैदान अमरावती येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद व प्रदर्शनीला लाखो शेतकरी, नागरिक व विद्यार्थी यांनी भेट देली,या प्रदर्शनीत पाच दिवसांमध्ये जवळपास १ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

 


      प्रदर्शनी मध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट, उद्योजक,स्टार्टअप, शासकीय विविध विभाग, यांचे जवळपास २८८ स्टॉल उभारण्यात आले होते.

     सदर स्टॉलला अमरावती करांनी सायंकाळचे वेळी भेटी देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे कृषी प्रदर्शननीचे आयोजक तथा प्रकल्प संचालक आत्मा अर्चना निस्ताने यांनी सांगितले.

    सदर प्रदर्शनी मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ ( मा. वि. म ) यांचे महिला बचत गटाचे 40 स्टॉल होते.

      महिला बचत गटांनी या प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवून त्या माध्यमातून विविध प्रकारचे धान्य, डाळी, मसाल्याचे पदार्थ, गृह उपयोगी वस्तू, व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.

सदर प्रदर्शनीचे उद्घाटन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व खा. अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते.

      सदर प्रदर्शनीला जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार, यांनी उपस्थिती दर्शविली. खा. बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर प्रदर्शनीचा समारोप करण्यात आला.




Post a Comment

Previous Post Next Post