मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
पुढील वीस वर्षात भारताला महासत्ता होण्यासाठी असंख्य निष्णात डॉक्टर आणि इंजिनीयर यांची गरज आहे. ही घडविण्याची पुर्वतयारी नीट आणि जेईई सारख्या स्पर्धात्मक परीक्षा मधूनच होते. दर वर्षी या परीक्षांना तीस लाखाहून अधिक मुले बसतात.
डॉ. महेश अभ्यंकर आणि डॉ. नेहा अभ्यंकर लिखित ‘रँक’ या पुस्तकाचे प्रकाशन राजहंस पुरस्कार सोहळ्यात १६ फेब्रुवारीला गोरेगाव मध्ये थोर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकाशनाला डॉ. उदय निरगुडकर, वंदना गुप्ते, डॉ. रत्नपारखी, टच सामाजिक संस्थेच्या डॉ. मेनन आणि थोर समाजसेवक सुहास कबरे यांचे आशीर्वाद लाभले.
भारतातील पहिल्या दहा प्रसिद्ध वैद्यकीय रुग्णालयातील एक म्हणजे के ई एम रुग्णालय. डॉ. महेश यांनी १९९१ मध्ये मालवण मधून आणि तर डॉ. नेहाने २०२० मध्ये कोविडच्या काळात नीट मध्ये यश मिळवत के. ई. एम. प्रवेश घेतला. उत्तम तयारी करतानाचा प्रवास, त्यात अनुभवलेले चढ -उतार आणि त्याना गवसलेला यशाचा मंत्र ‘रँक’ ह्या पुस्तकात मांडला आहे.
अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. महेश आणि डॉ. नेहा अभ्यंकर यांनी दिलेला संदेश म्हणजे “मोठी स्वप्न पाहा, लवकर सुरवात करा, सातत्य राखा, एम. सी. कयू.ची उत्तम तयारी, मेहेनतीला प्रयोजनाची जोड द्या, आई-वडिलांची आणि शिक्षकांची सोबत, मन सुद्रुढ ठेऊन आत्मविश्वासाने यश मिळावा.”
‘रँक’ पुस्तकाचा एक चॅप्टर कर्करोगावर वर मात करून नीट परीक्षेत विजय मिळविणारी सिद्धी भिडे हिने लिहिला आहे. ‘रँक’ पुस्तकाच्या प्रकाशनात नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे आणि संपादक रविराज गंधे यांचा मोलाचा वाट आहे.
वाचाल तर वाचाल
वाचाल तर वाढाल
रँक पुस्तक वाचाल. तर रँक मिळवाल
रँक पुस्तक भेट द्याल, तर करिअर घडवाल
एक पुस्तकं हे माणसाच्या जीवनाला कलाटणी देऊ शकते. ‘रँक’ हे पुस्तक असंख्य विध्यार्थ्यांच्या करिअरला नक्की आकार देईल.
रँक (सक्सेस मंत्र @ नीट जे ई ई)
लेखक- डॉ. महेश अभ्यंकर आणि डॉ. नेहा अभ्यंकर
प्रकाशक- नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठे- १९४ मूल्य- रुपये ३५०/-
संपर्क: डॉ. महेश अभ्यंकर (९८२०४५०९८६)