ऍग्री स्टॅक योजनेत नोंदणी करून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन
श्रीक्षेत्र माहूर
माहूर : तालुक्यातील ई पीक पाहणी अंतर्गत नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी करून घेण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी आपापल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांचे सहायक मार्फत करण्यात येत असून शेवटची तारीख दिनांक 28.02.2025 आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची पीक पाहणी झाली नाही अशांनी ती आपापल्या गावातील सहाय्यक व्दारे लवकरात लवकर करून घ्यावी तसेच ऍग्री स्टॅक योजनेसाठी दि 28 रोजी सिंदखेड 3 तारखेला माहूर 4 तारखेला वाई बाजार तसेच 5 तारखेला वानोळा येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याने शंभर टक्के शेतकऱ्यांनी आपापली नोंदणी करून घेण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
तसेच ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक नोंदणी, नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्यास अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी शेतकरी ओळख क्रमांक काढणे अनिवार्य आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजना, पीक विमा, नैसर्गीक आपत्ती अनुदान, पिक कर्ज व इतर शासकीय योजनाचा लाभघेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीस योजनांचा लाभमिळणार नाही शेतकरी ओळख क्रमांक काढण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक तसेच शेतीचा गट क्रमांक माहीत असणे आवश्यक आहे.आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र येथे संपर्क करून आपली नोंदणी शेतकऱ्यांना स्वतः करावी लागणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व कामे बाजूला ठेवून ऑनलाईन नोंदणीच्या ठिकाणी वरील कागदपत्रे घेऊन स्वतः ई पीक पाहणी तसेच ऍग्री स्टॅक योजनेची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.