गावाकडची बातमी |चांदूररेल्वे एसडीओ कचेरीवर धडकला बोंबाबोंब मोर्चा

 


चांदूर रेल्वे : शेतकरी , शेतमजूर ग्रामीण गरीबाचे ज्वलंत प्रश्नांना घेवून प्रचंड बोंबाबोंब मोर्चा संपूर्ण चांदूर शहराच्या मुख्य रस्त्याने जोरदार नारेबाची करीत चांदूर रेल्वे उपाविभागीय कार्यालयावर पोहचला . महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा व अखिल भारतीय किसान सभेचे वतीने हा मोर्चा काढण्यात आला . 

मोर्चामधे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेले बजेट शेतकरी , मजूर व कामगार विरोधी असल्यामुळे बजेटचा निषेध करून . शेतकऱ्यांचे मालाला हमी भाव द्या, बिबियांने खतावर अनुदान देण्यासाठी कार्यवाही करा.

 डा . स्वामीनाथन आयोगाच्या सिफारसी लागू करा व शेतकरयाची संपूर्ण कर्जमाफी करा ,मजूरासाठी मनरेगावर अधिक रक्कम द्या, असंघटीत कामगारांनचे मानधनात वाढ करण्यासाठी रकमेची तरतुद करा .

केरळ सरकारचे धर्तीवर ७ लाख रुपये घरकुल योजनेसाठी निधी द्या..

चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व घरकुल प्रलंबित अर्ज मंजूर करा..

लाडक्या बहिन योजनेचे उर्वरीत अर्ज मंजूर करा कोणतीही लाडकी बहिनीला बाद करू नका , पंधराशे वरून एकवीसशे रुपये द . म . आश्वासना नुसार लागू करा..

संजय गांधी निराधार , श्रावणबाळ योजनेचे थकीत पैशे तातडीने देवुन ६ हजार द . म . पैसे द्या..

शालेय पोषण आहार कामगारांचे १ हजार मानधन वाढ आश्वासन दिल्या प्रमाणे त्वरीत द्या व मधे वाढ करुन किमान १८ हजार द . मा . मानधन द्या ..

 उमरपूर गावात समाजमंदीराचे बांधकाम क्रांती ज्योती महीला मंडळाचे जागेवर करा व ग्रा. प . जळका ( ज. ) यानी नियोजीत केलेल्या जागेवर मंजूर असलेले काम त्वरित रद्द करा . ईत्यादी मागण्यांचा समावेश करण्यात आला . या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे कार्याध्यक्ष देवीदास राऊत , महादेव गारपवार , शाम शिंदे, दिलीप शापामोहन यांनी केले .



 मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होवून त्या ठीकाणी सरकारचे किसान मजूर विरोधी धोरणावर भाषणातून जोरदार हल्ला चढविण्यात आला .एसडीओ साहेब कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला . कनिष्ठ अधिकाऱ्यास निवेदन देवून प्रश्न निकाली न निघात्यास आंदोलन तिव्र करण्याचा ईशारा देण्यात आला.

    या बोंबाबोंब मोर्चात तालुक्यातील शेकडो शेकडो शेतकरी मजूरवर्ग सहभगी झाला होता यामधे रामदास कारमोरे, सुभाष खांडेकर , रेखा कुमरे, मंदा नंदरधने, मोहसीनखान, राजगुरू शिंदे , किशोर शिंदे , चंदा देवघरे , लता देवघरे, राजी शेख, देवीदास खडसे , अनील मारोडकर, आशिश रावेकर, यादव नन्नावरे, संजय वानखडे, मुकींदा तिरतकार, अशोक गवई, रमेश सोळंके , प्रवीन ठाकरे इत्यादीं मुख्य कार्यकर्त्याचा समावेश होता . शेवटी लालबावटा जिंदाबादच्या घोषना देवून आंदोलन संपविण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post