सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती,ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडीही माया,या उक्तीप्रमाणे बहिण भावाची घट्ट नाती जपणारी भाऊबीज -भेट बैलमारखेड या छोट्याशा गावामध्ये संपन्न....
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे भाऊबीज भेटीचा कार्यक्रम प्रचंड उत्साहात दि.3/1/24 रोजी संपन्न.
बैलमारखेडा, दगडागड, हातखेडा, वंडली या गावातील सक्षम महिला बचत गटातील महिला सभासदाद्वारे भाऊबीज भेट व औक्षवान संपन्न..
आपल्या परिसरातील माय- माऊलींची सुरक्षेची जबाबदारी प्रत्येक भाऊरायाने घ्यावी, तीच खरी भाऊबीज- प्रकाश साबळे यांचे प्रतिपादन
भावाच्या निरोगी आयुष्यासाठी बहीण भाऊबीजेच्या दिवशी सदिच्छा देते, बहीण हा मायेचा पाझर,त्यामुळे तिचा यथोचित सन्मान करा - सोमेश गावंडे यांचे प्रतिपादन
मुख्य अतिथी भंते नागसेन यांच्या पुढे नतमस्तक होऊन प्रकाश साबळे यांनी आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी प्रमुख मान्यवरांमध्ये डॉ. संतोषराव सनके साहेब, रुपेश कळसकर, शेखर अवघड, सोमेश्वर गावंडे, अमित कुचे, अर्जुन सनके, उपसरपंच कांता राणे, राजूभाऊ हजारे आदिजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी किशोरभाऊ वंजारी, श्री रमेशराव वंजारी,हेमंत वंजारी, भारत गवई,मिलिंद वंजारी तसेच पंचशील महिला मंडळ, बैलमारखेडा यांनी पुढाकार घेतला...