मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मैदानातून १६ जणांची माघार तर १५ उमेदवार मैदानात

 



मूर्तिजापूर -  विधानसभा मतदारसंघचे उमेदवारांचे चित्र ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट झाले आहे, आज अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज वापस घेतल्याने निवडणूक रिंगणात आता केवळ १५ उमेदवार राहिले आहे.

    ४ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने शेवटच्या दिवशी १६ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले छाननी अंती ३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते त्यात १६ उमेदवारांनी माघार घेतल्याने १५ उमेदवार मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविणार आहेत.  यामध्ये भिकाजी श्रावण अवचार, रमेश विश्वनाथ इंगळे, सम्राट डोंगरदिवे, हरीष मारोतीआप्पा पिंपळे,  किशोर ज्ञानेश तायडे, किशोर पुंडलीक खंडारे, सचिन धनराज कोकणे, सम्राट माणिकराव सुरवाडे, सुगत ज्ञानेश्वर वाघमारे, सौ. अंकिता राजू शिंदे, प्रा. डॉ. धनराज रामचंद्र खिराडे,  यशवंत गोविंद इंगोले, रवि रमेशचंद्र राठी, राजश्री हरीष खडसे, शैलेश रुपराव वानखडे हे १५ उमेदवार रिंगणात आहेत तर  राजेश तुळशीराम खडे, रविंद्र नामदेव पंडीत, भाऊराव सुखदेवराव तायडे, संतोष देविदास इंगळे, अरुण सखाराम गवई, दयाराम बोंदरु घोडे, सिध्दार्थ ब्रम्हदेव डोंगरे, गोपाळराव हरीभाऊ कटाळे, गजानन शिवराम वझिरे, पंकज ओंकार सावळे, महेश पांडूरंग घनघाव, राजकुमार नारायणराव नाचणे, विनोद बाबुलाल सदाफळे, सुनील जानराव वानखडे, पुष्पाताई महादेव इंगळे, महादेव बापुराव गवळे या १६ लोकांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post