फुले, शाहू ,आंबेडकरी विचारांचा माणूस प्रा.विजय खुपसे यांना विविध सामाजिक संघटनेचा पाठिंबा...
तिरंगी नव्हे तर चक्क चौरंगी लढत होणार असल्याच्या चर्चांना उधाण..
माहूर,किनवट - विधानसभा मतदार संघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच विविध राजकीय पक्षानी आपआपले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
गावा गावात- चौकात अपक्ष उमेदवार प्रा.विजय खुपसे यांच्या नावाची चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे.किनवट,माहूर विधानसभा मतदारसंघ हा आंध आदिवासी समाजातून प्रा. विजय खुपसे यांना वाढता पाठिंबा आहे.