किनवट : 20 जून 2025 रोजी सिंदगी मो. येथील समायत रमेश उमरे (गोलू) वय 21 वर्षे, ह. मु. रा. सिद्धार्थ नगर, गोकुंदा यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
शुक्रवारी दि. 20 जून 2025 रोजी सायंकाळी 10:15 वाजता समायत मोटारसायकलवरून गोकुंदा येथून बोधडीकडे जात होते. दरम्यान, बोधडी येथील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्ती ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या गंभीर अपघातात समायत उमरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर हार्दिक अशोक नगारे गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला सर्व प्रथम उप जिल्हा रुग्णालयात गोकुंदा तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. स्थानिक पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.