जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
अमरावती : चांदुर बाजार तालुक्यातील निमखेड फाटा ते ग्राम निमखेड पर्यंत सुरळीफाटा ते ग्राम सुरळी डांबरी रस्त्याचे बांधकाम चांदुर बाजार उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग कडून जवळपास १ वर्ष आधी करण्यात आले होते.
ह्या झालेल्या डांबरीकरण यांच्या कामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्या मुळे १ वर्षात ह्या डामरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्या दिसेनाश्या झाल्या आहेत,रस्त्यावर खड्डे पडले आहेत या मुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता आहे व ऐन पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्याचे साचलेल्या पाण्यातून चिखल निर्माण झाल्या मुळे चिखलात रस्ता आहे कि रस्त्यावर चिखल आहे अशी अवस्था निर्माण झाली आहे.तरी तक्रारकर्ता योगेश इसळ यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चांदुर बाजार येथे तक्रार दाखल केली असून संबंधित ठेकेदारान कडून तातळीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.