युवाहित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय संघटनाच्या अमरावती शाखेच्या वतीने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते ह.भ.प. श्री तुकाराम बाबा महाराज यांचे अमरावती येथे भव्य स्वागत.

 

Prakashsable



मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील प्रशिक्षणार्थींसोबत चर्चा व संवाद व्हावा यासाठी ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी राज्यभर संवाद दौरा आयोजित केला, त्यानिमित्ताने दिनांक 20/6/25 रोजी अमरावती येथे युवाहित मुख्यमंत्री युवाहित प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते प्रकाश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली परम श्रद्धेय ह.भ.प. तुकाराम महाराज यांचा युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या भव्य, भरगच्च उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश गडपाल, सचिव अक्षय सरोदे, उपाध्यक्ष कार्तिक टवलारे, महासचिव ओम चित्रकार, तालुका अध्यक्ष भारती जाधव, प्रफुल्ल घुंगरूड तसेच संघटनेचे शेकडो महिला, पुरुष पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगारासाठी अंतिम श्वासापर्यंत लढाई लढू व यशस्वी होऊ,असे निर्धारपूर्वक वक्तव्य ह.भ.प.श्री तुकाराम बाबा महाराज यांनी उपस्थित युवा प्रशिक्षणार्थ्यांसमोर व्यक्त केले.

 युवा प्रशिक्षणार्थी यांनी घरी न बसता आपल्या न्याय हक्कासाठी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या प्रत्येक लढाईत सक्रिय सहभाग द्यावा, असे भावनिक आवाहन युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते प्रकाश साबळे यांनी केले.

 ह.भ.प श्री तुकाराम बाबा महाराज यांचे भव्य स्वागत अमरावती शाखेच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post