गावाकडची बातमीचे मराठवाडा संपादक अनिल बंगाळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

 




Gavakadachi batmi network 

गावाकडची बातमीचे मराठवाडा संपादक अनिल बंगाळे यांचा वाढदिवस संदेश मोबाईल गॅलरी येथे मित्रमंडळाच्या वतीने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी प्रा. विजयराव खूपसे, सुशील कदम (पाटील), दिलीप गायकवाड, मनोज भुरके, डॉ. अरविंद भुरके, मुंबईहून आलेले भाऊरावजी घुले, संदेश मोबाईल गॅलरीचे संचालक संदेश भवरे, शीलवंत भगत, अमोल सुदेवाड, शिवकृपा हार्डवेअरचे मालक संतोष शिंदे (मारेगावकर), संतोष माधव शिंदे तसेच सुनील जाधव (सिंदगीकर) उपस्थित होते.


उपस्थित मित्रपरिवाराने अनिल बंगाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. सर्वांच्या उपस्थितीत अतिशय साध्या व उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.


Post a Comment

Previous Post Next Post