जुड़वा नगरीत जून ते सप्टेंबर पर्यन्त १५ टप्प्यात होणार वृक्षारोपण
संतोष भालेराव/ परतवाडा
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनच्या आपले शहर-हिरवे शहर अभियानचा शुभारंभ पर्यावरण दिनी पुन्हा नगरवासी व हमीपत्रक धारक यांच्या सहयोगाने प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे... सदर सामाजिक पर्यावरण हिताय उपक्रम मध्ये सामिल होवून आपला परिसर हिरवा व प्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध सामाजिक, राजकीय संघटना आज एकत्र येवून बालाजी मंदिर परिसर तिरुपती नगर येथे प्राणवायु स्त्रोत व दुर्मिळ वृक्ष यांचे रोपण करुण संगोपन, संवर्धनची जवाबदारी अभिजीत कालमेघ मित्र परिवार, गौरखेड़ा कुंबी ग्रामपंचायत यांनी घेतलेली आहे.
आज विश्व पर्यावरण दिनी बालाजी मंदिर परिसर, तिरुपती नगर येथे दुर्मिळ होणारे वृक्ष म्हणजे पुत्रजीवा,उम्बर,अशोका व प्राणवायु स्त्रोत जाम्बुल, बेलपत्र चिंच, पिम्पल,वड या रोपटेचे रोपण करण्यात आले, सदर सामाजिक उपक्रम मधे हमीपत्रक अभिजीत कालमेघ, राजा पिंजरकर, विजू मिश्रा,सुधीर देशमुख,सागर वाटाने, पुरोहित महाराज,अंकुश बिडकर ग्रामपंचायत सदस्य,सुरेंद्र आठवले, अम्बादास नाडुले तथा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन व शकुंतला रेल बचाव प्रमुख योगेश खानझोड़े, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी,सुरेश प्रजापती,प्यारेलाल प्रजापति, संजय डोंगरे,संतोष नरेडी, रामदास मसने, एस.बी.बारखडे,कमल केजरीवाल, राजकुमार बरडिया,वसंतराव धोबे, मुरलीधर पडोळे, संजय कोरे तर माहेर फाउंडेशनच्या शारदाताई उइके, दीपाताई तायड़े,कनिष्ठ अभियंता कपिल नंदगांवकर सहित राष्टवादी कोंग्रेसचे अमोल गोहाड,राहुल वैद्य यांच्या उपस्थितित वृक्षारोपण अभियान प्रारंभ करण्यात आला, सदर वेळी सर्वप्रथम विश्व पर्यावरण दिनी सर्व रोपटे यांचे पूजन माहेर फाउंडेशनच्या दीपा तायड़े व शारदा उइके यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विश्व पर्यावरण दिनाचे तथा झाड़ाचे महत्व बाबत मनोगत पूर्ण मार्गदर्शन योगेश खानझोड़े, अभिजीत कालमेघ, राजा धर्माधिकारी, गजानन कोल्हे, अंकुश भिड़कर यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन राजा पिंजरकर यांनी मांडले...
सहभागी सामाजिक संस्था:-
१:-अध्यक्ष तथा समस्त पदाधिकारी आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन महा. प्रदेश
२:-अभिजीत काळमेघ मित्रमंडळ परतवाडा अचलपूर
३:-शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपुर
४:-माहेर फाउंडेशन परतवाड़ा
५:-मानव सेवा समिती परतवाड़ा
६: तिरुपती रॉयल्स, तिरुपती नगर गौरखेडा
७: ग्रामपंचायत गौरखेडा