पर्यावरण दिन निमित्य झुंज समाज सेवी संस्थेचा 5000 पारंपरिक झाडे लावण्याचा घेतला संकल्प

 

Environment


  पारंपारिक देशी झाडे लावण्याचे फायदे व महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरिता करणार जनजागृती 



  

                                                       

 जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर 

अमरावती : जिल्ह्यात अनादी काळापासून अनेक वृक्ष टिकून आहेत ते येथेच रुजतात आणि मानवाला, प्राण्यांना पशुपक्ष्यांना सहचर अशा पद्धतीने वाढत आहे.. असे झाडे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच पक्षांसाठी वरदान ठरतात .मात्र साधारणतः 1980 नंतर झटपट वाढवणाऱ्या विदेशी झाडांचे पेव फुटले आहे. जी झाडे आपले नाहीत ,पर्यावरण पूरक नाही फक्त हिरवीगार दिसतात झटपट वाढतात म्हणूनच ती लावण्याचे प्रमाण वाढले आहे ..पण तज्ञांच्या मते अशी झाडे मोठ्या प्रमाणावर फक्त पाणीच शोषतात आणि प्राणी पक्षांना निराधार ठरतात पण सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमात सुद्धा अशी झाडे लावली जातात असे चित्र दिसून येते पण त्यामुळे बहावा ,उंबर, वड ,पिंपळ, चिंच ,आपटा, कांचन, बहावा ,कदम ,फणस, आवळा ,आंबा ,कडुनिंब ,मोह, पळस ,शिसव, पगारा ,सावर, सिताफळ, जांभूळ, कोकम, कडूनिंब, करंज, कवट , बेल या स्थानिक झाडांची लागवड दुर्मिळ झाली आहे... आपल्या देशी झाडांच्या पिकलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पालापाचोळ्यातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतातून जमिनीचा कसा वाढण्यास मदत होते विघटन झालेल्या पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण होणारी पोषक द्रव्य पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत होती झाडांची मुळे खोलवर जाऊन जमिनीच्या मातीला खोलवर धरून ठेवत होती.. पाऊस निर्माण करण्याकरिता ढगांना आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात होती ती साखळी आता लोप पावत आहे.

म्हणूनच वातावरणामध्ये नेहमीच बदलाव निर्माण होत असल्याचे दिसून येते.. म्हणूनच आपण सर्व जनसामान्यांना प्रकृतीचे रक्षण करण्याकरिता आणि आपल्या पूर्वजांनी संगोपन केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.. आपले पारंपारिक झाडे हेच वातावरणासाठी खरे पोषक आहे हेच महत्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरिता झुंज समाजसेवी संस्थेने यावेळी पर्यावरण दिनानिमित्त 5000पारंपारिक देशी झाडे लावण्याचा संकल्प घेतला आहे..

त्याचप्रमाणे पारंपारिक झाडे लावण्यात करिता जनजागृती करण्याची मोहीम पर्यावरण दिनानिमित् सुरू करण्यात आली आहे यावेळी झुंज युवा बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक विकास संघ या संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते हे जिल्ह्यातील गावागावात जाऊन शहरांमधील जनसामान्यांना या पारंपारिक झाडाचे महत्व पटवून देतील असा संकल्प पर्यावरण दिनानिमित्त घेतला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post