मुख्य चौकातील वाहतूक ठप्प
मुर्तिजापूर : शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुर्तिजापूर आगारातील बस क्र एम.एच.०७ सी.९०५६ ही बस नियोजित कार्य करुन आगारात जमा होण्यासाठी जात असता दुपारी ११.३०.च्या सुमारास बसचे एक्सल तुटल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
प्राप्त माहितीनुसार मुर्तिजापूर आगाराची एस.टी.बस.नंबर.एम.एच.०७ ९०५६ चे चालक तथा वाहक हे आपले नियोजित कार्य करुन आगारात बस जमा करण्यासाठी जात असता अचानक भर चौकात म्हणजेच छत्रपती शिवाजी चौकात बस चे एक्सल तुटल्याने वाहतूक ठप्प झाली.शिवाजी चौक हा शहरातील मुख्य चौक आहे मुर्तिजापूर आगारातील बहुतांश एस.टी.बसेस भंगार झाल्या आहेत.आगारातील मॅकेनील थातूरमातूर बसचे काम करून बस मार्गावर सोडतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.अनेकदा मुर्तिजापूर आगारातील बसेस कोठेही बंद पडतात या कडे आगार व्यवस्थापक यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अकोला विभाग अंर्तगातील डिस्चार्ज झालेल्या बस मुर्तिजापूर आगारात पाठविल्या जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.नवीन बसेस आगारात न मिळाल्याने चालकांना कमालीची कसरत करावी लागत आहे.अनेकदा बसेस दुरूस्ती ची मागणी केली मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.