फसवणूकीला आळा घालण्यासाठी जागरूक राहणे आवश्यक - शाखा व्यवस्थापक

 

        विदर्भ संपादक मिलींद जामनिक 

मूर्तिजापूर - देशासह राज्यात बँकेच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे यावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक एस.यु. रामटेके यांनी व्यक्त केले आहे.

            नागरिकांकडे असलेल्या मौल्यवान वस्तू (सोनं ) पैसे हे सुरक्षितेच्या दृष्टीने बॅकमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला जातो मात्र त्याला हडपण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींकडून भ्रमणध्वनीवरून संवाद साधत शासनाच्या विविध योजनाच्या नावाखाली किंवा बॅकेचे अधिकारी/ कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांकडून ओटीपी,आधार नंबर, पॅन कार्ड नंबर अश्या पद्धतीची गोपनीय माहिती मागण्याचा प्रयत्न केला जातो. अश्या पद्धतीच्या भामटेगिरीला नागरिकांनी बळी न पडता त्याची सखोल चौकशी करून किंवा नजीकच्या बँक शाखेत जाऊन खात्री करून घ्यावी जेणे करून नागरिकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. खास करून महाराष्ट्र बँकेच्या नावाखाली बाजारात कोणी अज्ञात व्यक्ती बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक मागणी किंवा आमिष देत असेल तर अश्या भुलथापांवर विश्वास न ठेवता कार्यालयीन वेळेत कर्जविषय समस्यांबाबत थेट शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

--------------------------------------------

 या आहेत नव्या कमी व्याज दरात कर्ज योजना, लाभ घेण्याचे आवाहन

* गृह कर्ज योजना - ७.३५%

* वाहन कर्ज योजना - ७.७०%

* सुवर्ण कर्ज योजना - ८.३%

* वैयक्तीक कर्ज योजना - ९%

* शैक्षणिक कर्ज योजना - ७.१०%

* बचत ठेवीवर परतावा - ७.६५%


Tags : #Bank_of_Maharashtra, #Maharashtra, #india, #murtizapurnews, #akolanews, #उद्योगमंत्री #अकोला , #एकनाथशिंदे, #कर्ज,#ग्राहक, #मुख्यमंत्रीमहाराष्ट्र, #अजितदादापवार, #देवेंद्रफडणवीस, #पोलीस,  #मूर्तिजापूर #नरेंद्रमोदी, #शिक्षण #rbi, #महाराष्ट्रबैक, #IndianBank, #रिझर्वबँक , #गुगल, #फेसबुक,#कंपनी, #cmMaharashtra, #PM, #Milindjamnik, #GavakadachiBatmi #नागरिक, #गृहकर्ज, #शैक्षणिककर्ज,#वैयक्तीककर्जयोजना, #वाहनकर्ज, #सुवर्णकर्ज, #एस.यु.रामटेके,  #महाराष्ट्र बैंक शाखा व्यवस्थापक एस.यु. रामटेके

Post a Comment

Previous Post Next Post