जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
शिराळा- अमरावती तालुक्यातील मोठे गाव पण सुविधा मात्र शुन्य इंग्रजांच्या काळात अमरावती नरखेड रेल्वे लाईनचा सर्वे झाला होता पण प्रत्येक्षात प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत रेल्वे सुरू झाली. शिराळा येथे रेल्वे स्टेशन बांधल्या गेले मात्र कोरोना मध्ये सर्व रेल्वे बंद होत्या त्यानंतर सुरू झाल्या मात्र शिराळा येथील थांबा सुरू झाला नाही शिवाय रेल्वे स्टेशनचे शेड काढण्यात आले. शिराळा रेल्वे स्टेशन काढण्यात आले तरी लोकप्रतिनिधी झोपेत आहेत शिराळा रेल्वे स्टेशन वरून कमी कमी पंधरा वीस गावातील प्रवासी जात होते, मोर्शी वरुड नरखेड तसेच शेगांव भुसावळ येथे प्रवासी जात होते.पण रेल्वे स्टेशन बंद केल्या मुळे प्रवाशांची गोची झाली. - शिराळा येथे विजेचा लपंडाव सुरू आहे अनेक वेळा तक्रारी करुन सुध्दा काही उपयोग नाही. येथे पावरहाउस आहे तरी पण पाऊस किंवा हवा असो की नसो लाईन गुल दिवसातुन दहा बारा वेळा लाईन चा लपंडाव सुरू असतो तसेच गावालगतच्या नाल्याला पावसाळ्यात पुर येवून गावात व घरात पाणी घुसुन दरवर्षी घराचे व शेतीचेही नुकसान होते. नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी अनेक वेळा तक्रारी दिल्या तरी कारवाई नाही पाच वर्षांपासून खोलीकरण नाही. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी धडरस्ते नाही. पांदण रस्ते पावसाळ्यापूर्वी करणार असे शासनाचे धोरण असुन सुद्धा शिराळा येथील पांदण रस्ते झाले नसल्यामुळे पेरणी कशी करावी असा यक्षप्रश्न शेतक-या समोर आहे. गावातील लाईनचे पोल खुप जुने आहेत शिवाय त्यातील अंतर खुप मोठे असल्यामुळे तार केबल लोंबकळत आहे.पावसाळ्यात सर्व शेतातील पाणी गावात घुसते पर्याने घरात घुसून नुकसान करते .या बाबींची शासनाने दखल घेतली नाही काही उपाय योजना केल्या नाही .या सर्व बाबींकडे कोणीही लक्ष देत नाही. मता पुरते राजकारण करतात. आता येतील मत मागायला जिल्हा परिषद पंचायत समिती करिता व नंतर येतील ग्रामपंचायत करिता हे झाले की गावाला विसरले अशी परिस्थिती आहे शिराळा गावाची . बाजारातील शेडवर टिनपत्रे नाही. अगोदर शेड, ओटे, टिनपत्रे होते ते काढून नवीन बाजाराचे मोझरी विकास आराखड्यातुन काम केले. परंतु आज पर्यंत टिनपत्रे लावले नसल्यामुळे व्यापारी व नागरिकांना भर पाण्यात बाजार करावा लागतो.पावसाळ्यात भाजी पाला व इतर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. रस्ते उखडले, नाल्या फुटल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे तरी नाल्या बांधण्याची गरज आहे.त्यामुळे पावसाळ्यातील पाणी गावात येणार नाही व येणाऱ्या पाण्याचा विल्हेवाट होईल. पण मांजराच्या गळ्याला घंटा बांधेल कोण? गांवात वाढलेले अतिक्रमण काढेल कोण? फक्त नावापुरते राजकारण सुरू आहे. विकासाची बोंब आहे तरी लोकप्रतिनिधी या बाबींची दखल घेऊन शिराळा येथील समस्या सोडवाव्यात अशी शिराळा येथील ग्रामस्थांची मागणी आहे.