चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जमा केला दुष्काळग्रस्तांसाठी निधी

 


उपक्रमशील शिक्षक संजय जोशी यांचा पुढाकार

Mahurnews






श्रीक्षेत्र माहूर:

माहूर तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधी जमा करण्याच्या सुरू केलेल्या उपक्रमाची सुरुवात मालवाडा जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक संजय जोशी यांनी शाळा स्तरावरून सुरुवात केल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जमा केलेला निधी त्यांचे सुपूर्द करण्यात आल्याने शिक्षक संजय जोशी यांचे अभिनंदन होत आहे 


 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवाडा येथे माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधी जमा करण्यासाठी मालवाडा जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता यांचे सोबत पंचायत समिती गटसमन्वयक काशीनाथ थोंटे तसेच केंद्र समन्वयक संतोष मोहन चव्हाण केंद्र समन्वयक डॉ अरुण धकाते यांचे सह मान्यवर उपस्थित होते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत फेरी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशाची बचत करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे योगदान दिले त्याचबरोबर मदत फेरीमध्ये जी रक्कम जमा झाली त्याचा योग्य विनियोग करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकर यांच्या प्रेरणेने संकलन निधी गावचे पोलीस पाटील शरद बेहेरे विलास बेहेरे अंगणवाडी सेविका शितलताई बेहेरे त्यांनी सुद्धा आपली योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते जमा करण्यात आलेली रक्कम गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकर यांच्या सुपूर्द करण्यात आली मुख्याध्यापक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्व प्रेरणेने आपले योगदान दिल्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यासह आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांसह उपक्रमशील मुख्याध्यापक संतोष जोशी यांचे गावकऱ्या समक्ष अभिनंदन केले .

यावेळी गटशिक्षणाधिकारी यांचे सह आलेले डॉ अरुण धकाते यांनी जलतारा शोषखड्डे पाणी बचत स्वच्छता अभियान याबाबत विद्यार्थ्यासह गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन माधव बाभळे सरांनी केले मुख्याध्यापक संजय जोशी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष छोटू इस्माईल कुथे यांनी विद्यार्थ्यासह आलेल्या मान्यवरांचे आभार मानले यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी तालुक्यातील सर्व शाळा सह दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post