सुरज विजय जाधव यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कामकाज सुरळीत; शेतकऱ्यांना दिलासा!

 





उमरी : महाराष्ट्र ग्रामीण बँक उमरी येथील शाखा बंद अवस्थेत असल्याने शेतकरी व खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन सरपंच सुरज विजय जाधव वसराम नाईक तांडा यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराला परिसरातील आजूबाजूच्या गावांतील शेतकरी व खातेदारांनी पाठिंबा दिल्याने बँकेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले.


शेतकरी व खातेदारांच्या पाठिंब्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कर्मचारी वर्ग उपस्थित झाला. यावेळी बँकेचे कामकाज सुरळीत करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर अवलंबून असलेल्या शेतकरी व खातेदारांना दिलासा मिळाला.


बँक बंद ठेवण्यामागचे कारण काय?


बँक व्यवस्थापकांना काही शेतकरी खातेदारांकडून शिवीगाळ करण्यात आल्यामुळे आज बँक बंद ठेवण्यात आल्याची प्रतिक्रिया बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात शेतकरी व बँक कर्मचारी यांच्यात समन्वय राखून बँकेचे कामकाज नियमित सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुरज विजय जाधव यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याने शेतकरी व खातेदारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post