वानोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अशा वर्कर भरती प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचा अर्जदारांचा आरोप

 


वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वाठोरे यांनी अर्ज स्वीकारून वरिष्ठ स्तरावरून पुढील दोन दिवसात निकाली काढण्यात येईल असे सांगितले 



माहूर तालुक्यातील आशा वर्कर भरती प्रक्रिया वादाच्या छायेत .


मोठा आर्थिक व्यवहार करून मनमानी निवड केल्याची नागरिकांमध्ये चर्चा .



पंडित धुप्पे 

जिल्हा विशेष प्रतिनिधी


 माहूर तालुक्यातील वानोळा प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रासह इतरही प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेली आशा वर्कर भरती मध्ये मोठा आर्थिक व्यवहार होऊन नियमबाह्य भरती करण्यात आल्याचा आरोप अर्जदाराने केलाआहे.प्रक्रियेमध्ये अर्ज मागविण्यात आलेले होते. अनेक महिलांनी अर्ज सादर केले. पात्र व अपात्र यादी लावण्यात आली नाही किंवा याबाबत अर्जदारांना कोणतीही कल्पना दिलेली नाही.





पाच ते सहा महिन्यानंतर निवड केलेल्या अर्जदारांना निवड केलेले आदेश देण्यात आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.निवड झालेले अर्जदाराची शैक्षणिक गुणवत्ता कमी असल्याने जास्त गुणोत्तर असलेल्या अर्जदाराने आमच्यावर अन्याय झाला असून निवड प्रक्रियेतील आदेश रद्द करणे ,नियमानुसार निवड करणे अशी मागणी लेखी अर्जा नुसार करण्यात आली आहे यावेळी वानोळा गावातील अनेक महिला अर्जदार आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वाठोरे ,अशा वर्कर सुपरवायझर निशा पवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.







Post a Comment

Previous Post Next Post