कोळंबी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक ठार, एक जखमी...!

 


विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक सरसावले जखमींच्या मदतीला





कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोजच अपघाताची मालिका सुरूच आहे आज पहाटे कोळंबी दाळंबी गावाच्या मधात आयशर गाडी पलटी झाला त्याचबरोबर आज संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान सुद्धा चार चाकी गाडी आणी दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

           बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्ग ५३ वरील कोळंबी दाळंबी मधात आज सकाळी आयशर गाडी क्र. एम आर, ७४बि.१६६१ वरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता यावेळी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचबरोबर आज दुपारी चारच्या दरम्यान मूर्तिजापूर वरून अकोल्याच्या दिशेने जात असलेली दुचाकी क्रमांक एम.एच.२८.बि.सी.८४८२ जात असताना मागून येणारी चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.२८.५९८७ धडक लागल्यामुळे दुचाकी वर असलेला शेख शकील शेख जम्मू, रा.शेगाव त्याचा जाग्यावर मृत्यू झाला आहे तर टू व्हीलर वरील एक व्यक्ती सलीम उद्दीन काझी रियाजुद्दीन काझी जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळतात कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्काली शोध व बचाव पथक अध्यक्ष विजय माल्टे ,योगेश विजयकर, शुभम दामोदर, कोळंबी येथील पोलिस पाटील राजेश कानकिरड, नदीम भाई, यांनी जखमी युवकाला रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत कार्य केले घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ घटनास्थळी दाखल होऊन पुढील पंचनामा केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post