मिर्झा शफिक बेग यांची इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन मराठवाडा युनिटचे राज्य सरचिटणीस पदी निवड

 

मिर्झा शफिक बेग यांची इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन मराठवाडा युनिटचे राज्य सरचिटणीस पदी निवड 


 औरंगाबाद, महाराष्ट्र


इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरैशी यांच्या संमतीने मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मोहम्मद ताबीश यांनी औरंगाबाद निवासी ज्येष्ठ पत्रकार व औरंगाबाद न्यूज मराठी दैनिकाचे संपादक मिर्झा शफीक बेग यांची मराठवाडा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.

 औरंगाबाद न्यूज मराठी दैनिकाच्या कार्यालयात उपस्थित सर्व पत्रकारांनी मिर्झा शफीक बेग यांचे पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले.

 पत्रकारांना संबोधित करताना मिर्झा शफिक बेग म्हणाले की, इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनमध्ये शहरापासून गावापर्यंतच्या सर्व पत्रकारांचा समावेश करून मी पत्रकारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी सातत्याने लढा देत राहीन.

 यावेळी इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन औरंगाबाद शेख इरफान खान, जिल्हा सरचिटणीस अजीम खान, जालना जिल्हाध्यक्ष आमेर खान, जिल्हा सचिव शेख सलीम, मिर्झा मुख्तार बेग, शेख अजीज, शेख वसीम, अब्दुल बासीद आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post