श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव: कलगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य गोदावरी टीकाराम कदम यांची कन्या कुमारी स्नेहा टिकाराम कदम यांची महागाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कनिष्ठ सहाय्यक पदी निवड झाली असून कु.स्नेहा टिकाराम कदम हिने आपल्या शिक्षणातील अथक परिश्रमाने न्याय क्षेत्रातील महत्त्वाच्या कनिष्ठ सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल आपल्या आई आणि वडीलांचे नाव महागाव कलगाव गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात उंचावून यशाला गवसणी घातल्याने कलगाव गावाचे नाव लौकिक केल्या बद्दल कु. स्नेहाचे चौफेर कौतुक केले जात आहे.
असातच कलगाव येथील प्रतिष्ठित पवार परिवारातर्फे काल दिनांक २५ डिसेंबर रोजी महागाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल कैलासराव पवार तथा गावातील प्रमुख लोकांच्या वतीने कु.स्नेहाचा व आई गोदावरी कदम , वडील टिकाराम कदम, भाऊ व काका शामराव कदम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार केला आहे. यावेळी महागाव खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विशाल पवार, अनिलराव भोपळे, रमेश पवार सर, नरेंद्र पवार, शामराव कदम, रगंराव वानखेडे, पंजाबराव वानखेडे आणि गावातील इतरही अनेक लोकांची उपस्थिती होती.