श्रीकांत राऊत, यवतमाळ
महागाव - तालुक्यातील सारकिन्ही जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची बदली झाल्याने वर्ग पहिली ते पाचवी पर्यंत ७८ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी दोन शिक्षकांवर आली.
त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थिनींनी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे हे महागाव तालुक्यातील सारखणी येथे जनतेच्या आभार मानण्यासाठी आज शुक्रवार २७ डिसेंबर रोजी दोन वाजता आलं असता चिमुकल्या विद्यार्थिनी शैक्षणिक नुकसानाबाबत त्यांना माहिती दिली व तात्काळ शिक्षक देण्याची मागणी केली.
यावर आमदार किसनराव वानखेडे यांनी येत्या काही दिवसांत तत्काळ एक शिक्षक देण्याचं आश्वासन या वेळी विद्यार्थ्यांना दिले.