ती वाहतुक कोंडी धोक्याची ठरणार ; जबाबदार कोण ?



बाजाराच्या दिवशी दिवसभरासह रात्री पर्यंत वाहतूक नियंत्रक ठेवण्याची गरज...!




मूर्तिजापूर - शहरातील उड्डाणपूलाजवळील चौकात नेहमी वर्दळ असते शुक्रवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने ह्या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते हि वाहतूक कोंडी एखाद्याच्या जिवावर बेतली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

           शहरासह तालुक्यातल्या ग्रामिण भागातील नागरिकांना मापक दरात वस्तुची खरेदी करण्याच्या दृष्टीने आठवडी बाजार शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भरतो आणि दर्यापूर सह तालुक्यातील इतर भागातील लोकांना ये-जा करण्यासाठी उड्डाण पूल हा एकमेव रस्ता असल्याने आठवडी बाजाराच्या चौकात फार मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला बसत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊन त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एखाद्या वेळेस अतिआवश्यक उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका आली तर रस्त्यावर भरत असलेला बाजार व त्यापासून होणारी वाहतूक कोंडीमुळे त्या रुग्णाचा जीव जाण्याची वेळ येऊ शकते अशी असणारी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन शुक्रवार म्हणजेच बाजाराच्या दिवशी दिवसभर नियमित वाहतुक नियंत्रकांची हजेरी त्याठिकाणी लावावी जेणे करून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होऊन एखाद्याच्या जिवावर बेतणारी घटना वाचेल व त्याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. वाहतुक नियंत्रक उड्डाण पुलाजवळील नाक्यावर केसेस दाखल व वसुली करण्यात व्यस्त राहत असल्याचे एका खाजगी वाहन चालकाने नाव न घेण्याच्या अटीवर गावाकडची बातमी शी बोलतांना सांगितले.





----------------------------------------------

सदर ठिकाणी कर्मचारी नियुक्त केले असून बंदोबस्त ठेवण्यात येत असतो आणि बाजारचा दिवस असल्याने गर्दी होणे साहजीकच आहे तरी पण वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि पर्यायाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध झाली तर वाहतुक कोंडीवर मात करता येईल.

अजित जाधव, ठाणेदार

शहर पो.स्टे. मूर्तिजापूर

-----------------------------------------------

शुक्रवार बाजारचा दिवस असल्याने सर्वच लोक बाजाराला येतात त्यामुळे गर्दी होते यावर जनसामान्यांच्या जिवाची पर्वा करून संबंधित ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे आणि वाहतुक नियंत्रक नियमीत ठेवावे म्हणजे विपरीत घटना घडणार नाही.

बंडूभाऊ डाखोरे, जिल्हा सरचिटणीस

राष्ट्रशक्ती हमचालीस संघटना मूर्तिजापूर

-------------------------------------------------

समस्या जीवघेणी ठरतेय भर बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिला, नागरिकांना कोण, कधी, कशी धडक देईल याचा नेम राहिला नाही. या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. 

सुनिल सरदार, तालुकाध्यक्ष

वंचित बहुजन आघाडी

Post a Comment

Previous Post Next Post