शासकीय निधीचा अफलातून दुरूपयोग!
सर्वच शासकीय यंत्रणा बेजबाबदार!
गावाकडची बातमी स्थानिक प्रतिनिधी संतोष भालेराव
परतवाडा: अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सावळी दातुरा ग्रामपंचायत क्षेत्रातील खेलतपमाळी अंजनगाव रोडवरील एका खासगी ले आऊट मधे जिथं एकही नागरिक वास्तव्यास नाही तिथे पन्नास लाखांचे रस्ते बांधण्याचा प्रताप ग्रामपंचायत सावळी दातुरा यांनी तहकूब ग्रामसभेत विधानपरिषदे ची आचारसंहिता लागू असताना करून दाखविला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तहसील कार्यालय ( मग्रारोहयो )अचलपूर च्या सहकार्याने करून दाखवला आहे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना अजुनही प्रत्येक गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी धड रस्ते नाहीत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तालुका म.ग्रा.रो.ह .यो. विभाग व पंचायत समिती अचलपूर येथील अधिकारी शहानिशा न करता धडाधड आपल्या मर्जीतील लोकांना ग्रामीण भागातील नागरिकांना/ ग्रामपंचायतींना शासनातर्फे विविध प्रकारच्या विकास कामांसाठी मिळणारा निधी खिरापती सारखा वाटत सुटले आहेत, कोणत्याही प्रकारच्या विकास कामांसाठी ग्रामीण भागात सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत/ मासिक सभेत सदर कामांसाठी लागणारा मंजूर ठराव परंतु ते ठराव सुद्धा आता स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी मॅनेज करताना अशा प्रकरणात आढळून येत आहेत सावळी दातुरा ग्रामपंचायत क्षेत्रातील काही नागरिकांनी सदर कामाची तक्रार जिल्हाधिकारी व रोजगार हमी योजनेच्या तक्रार निवारण अधिकारी अमरावती यांचेकडे केली आहे त्यामुळे निर्मनुष्य ठिकाणी केल्या गेलेल्या रस्त्याचे काम आता तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या चर्चैचा विषय झाला आहे या मध्ये सर्वच शासकीय यंत्रणा कशा प्रकारे शासकीय निधीचा दूरूपयोग ग्रामीण भागातील जनतेला अंधारात ठेवून गावाच्या वेशीवर टांगून खाजगी लोकांना फायदा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे आता सिद्ध होताना दिसत आहे ९५/५ च्या निधीतून हे काम झाल्याचे कागदपत्रे तपासल्यावर लक्षात आले आहे परंतु सर्वात मोठा अचंबा असा आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थळं निरिक्षण करताना जिथं कुठल्याही प्रकारची मानवी वस्ती नाही तिथे रस्ता बांधून काय फायदा ? हे सगळं लक्षातच कसं आलं नाही ? कि तेही या प्रकरणात सामिल आहेत हे विचार करायला लावणारी गोष्ट आहे ज्या खाजगी ले आऊट मधे सदरच्या रस्त्याचं कामं झाले आहे त्या ले आऊट ला २०२२ मध्ये उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या आदेशानुसार मंजुरी मिळाली आहे त्यामध्ये ठळकपणे नमूद आहे की तत्कालीन मंडळ अधिकारी परतवाडा सर्कल यांनी दिलेल्या अहवालानुसार रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या व इलेक्ट्रिक पोल लावून काम पूर्ण झाल्यामुळे परवानगी देण्यास हरकत नाही मग पुन्हा २०२३ मधे सावळी दातुरा ग्रामपंचायत अंतर्गत तहकूब सभेत सर्वे नंबर २७२ खेलतपमाळी अंजनगाव रोडवरील निर्मनुष्य अशा खाजगी ले आऊट मधे ठराव मंजूर करून ५० लाखांचे रस्ते बांधण्याचा निर्णय कसा काय घेतला ? सावळी दातुरा येथील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही ? त्यांनी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांनी दिलेल्या एन ए परवानगी ची प्रत वाचली नाही कि तेही या प्रकरणात सामिल आहेत ?
शासकीय यंत्रणा नेमक्या कोणासाठी काम करतात ?
ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याच अधिकारी/ अभियंत्यांच्या लक्षात रिकाम्या ले आऊट मधे रस्ता का बांधकाम करत आहेत ही बाब कशी लक्षात आली नाही हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे !
अचलपूर तहसील क्षेत्रातील पंचायत समिती अंतर्गत अजून किती ठिकाणी अशा प्रकारचे काम करण्यांत आले व रोजगार हमी योजनेअंतर्गत शासकीय निधीचा दूरूपयोग झाला आहे हेही तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे असे येथील गावकऱ्यांनी बोलताना सांगितले आहे.
सदर चुकिच्या कामांबाबत आम्ही स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात ठोस पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. मी स्वतः सावळी दातुरा येथील रहिवासी नागरिक असून गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी धड रस्ता नाही परंतु त्या कडे लक्ष न देता ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी इतर शासकीय यंत्रणेसोबत संगनमताने शासकीय निधीतून खाजगी व्यक्ती ला लाभ मिळवून दिला आहे.
निलेश आखरे उपोषणकर्ते
नागरिक सावळी दातुरा