Gavakadachi batmi
आष्टी (श) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना तालुका अध्यक्षपदी पोरगव्हान (पंचाळा) येथील कट्टर शिवसैनिक चंद्रशेखर नेहारे यांची नियुक्ती करण्यात असून आष्टी शहराध्यक्षपदी विनायक हेडाऊ यांची निवड करण्यात आली. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड महत्वाची मानल्या जात आहे वर्धा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संदीप भोज यांच्या सहीचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडी बाबत सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.