गरीबांच्या विठ्ठला
आषाढीला भक्त सर्व सोडून येती तुझ्या चरणी
भक्तांच्या घरातली साखर चहा ची रिकामी रे भरणी......
भोळ्या भाबड्या चा तु आहेस रे वाली
कधि करशील बा विठ्ठला त्यांच्या शेताची रखवाली .......
पाऊसा अभावी पेरणी , निसटून गेली आज
भक्तांच्या आयुष्याचा कोणा, राहणार का रे वांझ......
कसा बा पांडुरंगा विठ्ठला, तुला कळतं नाही
सर्व सोडून भक्त, तुझ्यात दंग राही........
कसे तुला सांगु, सांगु हेच कळेना
जखमां झाल्या मनीं, तर मलम कुठे मिळेना......
एवढा विश्वास,एवढा जिव्हाळा रे तुझ्या साठी
मग ऐकणार का, विठ्ठला भक्तांच्या कल्याणासाठी......
सौ शारदा अतुल भुयार कारंजा लाड जिल्हा वाशिम