कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)महामानव घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याजवळ सत्याग्रह केला.दलित शोषितांना न्याय मिळवून दिला.त्यांच्या बहुमोल शिकवणीचा आदर ठेवून येथील समाजसेविका व अभिनेत्री करुणा काथखडे समाजकार्य करत आहेत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३४व्या जयंती दिवशी करुणा काथखडे यांनी सर्वांसाठी कल्याण स्टेशनला मोफत पाणी वाटवाचा कार्यक्रम हाती घेतला होता.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन करुणा काथखडे या समाजसेवेचे हे काम त्यांनी अविरतपणे चालु ठेवलेले आहे.त्या समाजाच्या उत्कर्षासाठी विविध समाजउपयोगी उपक्रम राबवित असतात.करुणा काथखडे यांनी बेबसिरीज,गायन,शार्टफील्म मध्ये अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.करुणा काथखडे या येथील विविध सामाजिक संस्थांनवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तसेच विविध सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी करुणा काथखडे यांनी मोफत पाणी वाटवाच्या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन होत आहे.याप्रसंगी पाणी वाटप स्टाॅलला ब-याच सन्मानिय प्रतिभावंत आंबेडकर अनुयायांनी भेटी देऊन कौतुक कले.करुणा काथखडे यांनी सर्वांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.