बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनिल डोंगरे यांच्या आदेशानुसार बसपाचे पश्चिम विदर्भ झोन प्रभारी इंजि. दादाराव उईके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टी वाशिम जिल्हा युनिट ची बैठक स्थानिक सर्किट हाऊस येथे संपन्न झाली.
या बैठकीमध्ये वाशिम जिल्हा अध्यक्षपदी अॅड. राहुल गवई यांची एक मताने निवड करण्यात आली.या सोबतच प्रकाश आठवले यांची जिल्हा प्रभारी पदी बढती देण्यात आली. उपाध्यक्षपदी रुपेश वानखडे व सचिव सुजय पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी बसपाचे उपस्थितीमध्ये अॅड. संघनायक मोरे, उमेश जाधव, सुमेध राऊत, गजानन ठाकरे, वैभव गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.