बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी बेदम होती की, वकील महिलेच्या पाठीवर अन् अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत.
बीड,अंबाजोगाई : लाऊड स्पीकरमुळं आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार एका वकील महिलेनं केल्यानं तिला गावातील सरपंचासह १० पुरुष मंडळींनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे.
यामध्ये या महिलेचं शरीर काळं-निळं पडल्याचे फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाष्य केलं आहे. मारहाण करणारा सरपंच कोण आहे? त्याची एवढी हिंमत कशी वाढली? असा सवालही त्यांनी केला आहे.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी बेदम होती की, वकील महिलेच्या पाठीवर अन् अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत.
या महिलेनं गावातील ध्वनी प्रदूषणामुळं मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, तसंच आपल्या घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. त्याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला मारहाण केल्यानं याप्रकरणी आरोपींवर कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी होत आहे.
याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, "अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपनं जबर मारहाण करण्यात आली. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे.
सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य ? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा सवाल आव्हाड यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि बीड जिल्हा वकील संघाकडं केला आहे.