"एक कुलर विक्री- सोबत एक रोपटे फ्री" : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनचा अभिनव उपक्रम



शिव इलेक्ट्रॉनिक येथून तहसीलदार संजय गरकल यांच्या हस्ते 16 एप्रिल पासून शुभारंभ...





परतवाडा/ संतोष भालेराव 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा परतवाडा व अचलपूर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. "एक कुलर विक्री- सोबत एक रोपटे फ्री" या उपक्रमाची संकल्पना आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन यांच्यावतीने साकारण्यात आली आहे,यावेळी तहसीलदार संजय गरकल यांच्या हस्ते नारायण बोरेकर सरपंच मल्हारा यांना कुलर विक्री सोबत एक झाड देऊन या उपक्रमाला प्रारंभ झाला असून शकुंतला रेल बचाव समिती,माहेर फौंडेशन,मानव सेवा समिती सोबतच शिव इलेक्ट्रॉनिक एल.जी. शो-रूम चे संचालक प्रदीप कराळे, शिव कराळे,कर्मचारी रूंद व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी योगेश खानझोडे, गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल,दिपा तायडे,एस.बी. बारखडे,वसंत धोबे, रामदास मसने,संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती,नारायण बोरेकर, विजय गोंडचवर, दयाराम चंदेल, पंकज शर्मा, संजय गुरव, गौरव हिंगणे, मंगेश डहाके, शुभम राऊत, सौरभ दुबे, रतन ताकतोडे, रोशन बैस, प्रमोद भिडकर, उपस्थित होते

या उपक्रमाअंतर्गत, परतवाडा व अचलपूरमधील सर्व कुलर व ए.सी. विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते की, त्यांनी आपल्या ग्राहकांना कुलर किंवा ए.सी. विक्री करताना एक रोपटे मोफत द्यावे. यासाठी संबंधित संघटन विक्रेत्यांना मोफत झाडे पुरविणार आहे.

या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता झाले असून, त्यानंतर विक्रीसह झाडांचे वाटप सुरू करण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, आणि त्याचे संगोपन केले पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.

संघटनेचा उद्देश फक्त झाडे वाटणे नसून, प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात पर्यावरण जागरूकता निर्माण करणे हाच आहे.

Post a Comment

Previous Post Next Post