गावाकडची बातमी| आदिवासी कोरकू समाजातील लोकनृत्य पथकाचा मेघनाथपूर जवळ भीषण अपघात

 


आदिवासी कोरकू समाजातील लोकनृत्य पथकाचा मेघनाथपूर जवळ भीषण अपघात


अमरावती विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव 


आज दिनांक 16/04/2025 रोजी ग्राम बेडदाब्ल्डा येथील आदिवासी कोरकु समाजाचे गदुली ससून पथक यांना धारणी तहसील कार्यालयाकडून अमरावती येथे विमानतळ उद्घाटन प्रसंगी हजर राहणे बाबत तोंडी सूचना दिल्याने रात्रीला निघाले पथकास परतवाडा अमरावती रोड मेघनाथपुर जवळ सकाळी 4-5 दरम्यान भीषण अपघात घडला 

यामध्ये जवळपास 18 महिला पुरुष गंभीर जखमी झालेले सर्व त्याच ठिकाणी पडून होते.

जय आदिवासी समाज विकास संघठन महाराष्ट्र अचलपूर यांना माहिती मिळताच तात्काळ गाणूजी सावलकर अध्यक्ष व मिठारामजी कोल्हेकर उपाध्यक्ष हे सकाळीच घटना स्थळ पोहचून आवश्यक कार्यवाही करून उपजिल्हा रुग्णालय,अचलपूर येथे भरती करून सद्या उपचार सुरू आहे.

2 रुग्ण गंभीर चिंताजनक असल्याने अमरावती रेफर केले.

सदर अपघात घडल्यावर आता पर्यंत या ठिकाणी आयोजक फिरकलेच नाही.

Post a Comment

Previous Post Next Post