तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक सुभाष सावते यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात

 

Kinvat


प्रतिनिधी | मोहपूर

शासकीय आश्रम शाळा, मोहपूर येथील मुख्याध्यापक  सुभाष उकंडराव सावते यांनी तब्बल ३० वर्षांची प्रदीर्घ शैक्षणिक सेवा पूर्ण केल्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा ३१ जुलै रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहपूरच्या सरपंच सुवर्णाताई देवीदास आमले या होत्या.

या सोहळ्यास आमदार भीमराव केराम मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ ठाकरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद बोथींगे, आदिवासी विकास विभाग, अमरावतीचे विभागीय अध्यक्ष आडबलवार, आदिवासी सेवक शिरडे महाराज, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किसन सरकुंडे, गणेश कदम पाटील, कुंभार सर (मुख्याध्यापक, शासकीय आश्रम शाळा सारखणी), खिल्लारे सर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शासकीय आश्रम शाळा कोरटा), जाधव सर (मुख्याध्यापक, तुळशी) तसेच मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मटमवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी गावकरी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात पंढरीनाथ ठाकरे यांनी श्री. सावते यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवेला सलाम केला.

कार्यक्रमात विद्यार्थिनी संस्कृती प्रभाकर जेवलेवाड, श्रावणी ढगे आणि महेश्वरी बोडके यांनी मनोगत व्यक्त करून श्री. सावते यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुनील वारकर सर यांनी केले. उपस्थितांनी सुभाष सावते यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Post a Comment

Previous Post Next Post