राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या 20 व्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी; जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन



Maharashtra


भारतातील प्रतिष्ठित सामाजिक व धम्मप्रबोधन संस्थांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या 20 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन दि. 11 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कलिंग, भुवनेश्वर (ओडिशा) येथे करण्यात आले आहे. या पाच दिवसीय अधिवेशनात देशभरातील पदाधिकारी, धम्मसेवक आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

अधिवेशनाची सुरुवात दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता होणार असून, दि. 12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील 320 पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय विशाल अशोक धम्म विजयादशमी दीक्षा समारोह लाखो अनुयायांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

राष्ट्रीय बौद्ध महासभेचे संस्थापक व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व धर्मप्रकाश भारतीय बौद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशनाचे नियोजन सुरू असून, राष्ट्रीय अध्यक्ष बी. एस. बौद्ध, राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजि. रमेशचंद्र बनगोत्रा, सर्व राष्ट्रीय समन्वयक, महासचिव, सचिव, प्रभारी, देशातील 28 प्रदेशांचे अध्यक्ष, धम्मसेवक संघ, महिला आघाडी तसेच सामाजिक न्याय परिषदेचे पदाधिकारी तयारीत व्यस्त आहेत.

या अधिवेशनात देशभरातील बौद्ध समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन तन, मन आणि धनाने सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आनंद भालेराव, राष्ट्रीय महासचिव तथा प्रभारी (भारत), राष्ट्रीय बौद्ध महासभा यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post