औ.प्र.संस्थेत 'आपले संविधान २१ व्या शतकात कसे विकसित होत आहे', या विषयावर व्याख्यान
मूर्तिजापूर - भारताचे संविधान हा परम आदरणीय ग्रंथ असून आपणा समस्त भारतीयांसाठी संरक्षक व मार्गदर्शक असणारा हा ग्रंथ सर्वांनी आत्मसात करावा, असे आग्रही प्रतिपादन येथील ॲकेडमिक हाईटस् पब्लिक स्कूल चे प्राचार्य डॉ.प्रशांत धर्माधिकारी यांनी आज येथे केले.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अकोल्याचे नेहरू युवा केंद्र, येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतिने औ.प्र. संस्थेच्या डॉ.सतिश धवन सभागृहात 'आपले संविधान २१ व्या शतकात कसे विकसित होत आहे', या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. औ.प्र.संस्थेचे प्राचार्य संजय महाजन यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा,अविनाश बेलाडकर, विचारवंत प्रा.गोवर्धन इंगोले,
नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विलास वानखडे, रवि गोंडकर उपस्थित होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
संविधानाचे भारतीयांच्या जीवनातील महत्व विषद करतांना डॉ.धर्माधिकारी यांनी आजवर झालेल्या सर्व घटना दुरुस्त्यांचा आढावा घेऊन त्या संविधान सबलीकरणासाठी कशा पोषक व कालसुसंगत होत्या, ते स्पष्ट केले.
पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर यांनी संविधान निश्चितपणे विकसित होत असल्याचे सांगून त्याला धक्का पोचविणे कुणालाही कदापी शक्य नसल्याचे ठाम प्रतिपादन केले. प्रा,गोवर्धन इंगोले यांनी संविधानाचे महत्व अधोरेखित करतांना त्यावर सविस्तर भाष्य केले.
प्रास्ताविक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.लिना वाकडे यांनी केले. प्रा.दीपा देशमुख, प्रा.एस.व्ही.आडे, प्रा,बी.डी.निंघोट, प्रा.एस.डी.खंडारे, प्रा.ए.ए.सावलकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.