८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गावामधील भाई मंगळे योग प्रशिक्षण वर्ग, नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच श्री संत गुलाबपुरी महाराज यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्त भागवत सप्ताहामध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यांमध्ये दिशा फाउंडेशन, नेरपिंगळाई च्या वतीने उपस्थितांना महिला सन्मान शपथ देऊन संविधानिक मूल्यांची जनजागृती करत संविधानाने महिलांना दिलेले हक्क, अधिकार ई.संबंधी माहिती असलेले पत्रक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला गावकऱ्यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाला तिवसा मतदार संघातील आमदार राजेश वानखडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रीती मंगेश सावरकर यांनी केले व सहकार्य करणाऱ्या संस्था भाई मंगळे योग प्रशिक्षण वर्ग, नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व श्री. संत गुलाबपुरी महाराज संस्थानचे दिशा फाउंडेशन च्या वतीने आभार मानण्यात आले.