महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास ; कारंजा ते मूर्तिजापूर प्रवासा दरम्यानची घटना
मूर्तिजापूर - स्थानिक स्टेशन विभाग, चिखली रोड येथील राहिवासी महिला व शेजारी यांच्यासोबत कारंजा येथील गुरुमंदीरातून दर्शन करून बसने परत येत असताना प्रवासात अज्ञात चोरट्याने खेर्डा फाट्यानजीक 15 ग्रम सोन्याची चैन लंपास केल्याची घटना 7 मार्च रोजी 11वाजताच्या दरम्यान घडली होती.
याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राम मोहनलाल जोशी ( 45 ) रा. स्टेशन विभाग चिखली रोड यांची आई शनिवारी शेजाऱ्यासोबत कारंजा येथील गुरुमंदिरातून दर्शन करून शेगाव, चंद्रपूर जाणारी बस क्र एम एच 14 केए 8423 याने मूर्तिजापूर येथे घरी परत येत असताना अज्ञात चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची चैन किंमत 1 लाख रुपये चोरी केल्या बाबतच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला कलम 305 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे हे करीत आहे.